अण्णाभाऊंनी सामान्यांना जगण्याची ताकद दिली – सुश्मिता माने

अण्णाभाऊंनी सामान्यांना जगण्याची ताकद दिली - सुश्मिता माने

उदगीर (प्रतिनिधी ) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सामान्य माणसाला जगण्यासाठी आत्मविश्वास दिला, अन्यायाच्या विरुद्ध बंड करून उठण्याची मानसिकता दिली. अण्णाभाऊची साहित्यकृती ही दलित, उपेक्षितांसाठी, प्रेरणादायी आहे. असे विचार राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या जिल्हाध्यक्ष सुश्मिता माने यांनी व्यक्त केले.
त्या फुलेनगर, संजय नगर, चंद्रमानगर, माता रमाई नगर, बोधन नगर, म्हाडा कॉलनी या ठिकाणी आयोजित अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी नगरसेवक निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) हे होते.पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यकृतीमध्ये प्रत्येक ठिकाणी दलित, उपेक्षित, शोषित माणूस हा नायकाच्या भूमिकेत असल्यामुळे सामान्य माणसाला आपले महत्त्व लक्षात आले.
ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी अध्यक्ष भाषणातून समारंभातून निवृत्तीराव सांगवे सोनकांबळे यांनी अण्णाभाऊंच्या जीवनावरील विविध प्रसंगाचा वापर केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन बंटी घोरपडे यांनी तर प्रास्ताविक वीरकपाळे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!