१९ वर्षीय मुलानेच केला बापचा खून

१९ वर्षीय मुलानेच केला बापचा खून

गातेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील धक्कादायक घटना; पोलिसांनी आरोपींना केले जेरबंद

गातेगाव (प्रतिनिधी) : गातेगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीतील  चिंचोली बल्लाळनाथ येथील एका १९ वर्षीय मुलाने सतत दारू पिऊन आईचा छळ व मारहाण करणाऱ्या बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लातूर तालुक्यातील चिंचोली बल्लाळनाथ येथील नागनाथ खंडू काळे हा कोणताही कामधंदा करीत नव्हता व तसेच त्याला सतत दारू पिण्याची सवय होती. दारू पिल्यानंतर पत्नीला मारहाण करीत होता. या कारणावरून मयत नागनाथ काळे व त्याचा मुलगा आकाश यांच्यात नेहमी भांडणे होत असे त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्याचा मुलगा आकाश काळे याने मित्र रोहीत रघुनाथ पोपळे यास २०००० रू देण्याचे कबूल करून त्याच्या मदतीने दि ३० जुलै २०२२ रोजी रात्री अंदाजे आठ वाजता वडील घरी एकटेच असतांना दोघांनी नागनाथ काळे यांच्या गळ्यावर वार करून करून जिवे ठार मारले. त्यावरून  गातेगाव पोलीस स्टेशन येथे गरनं ८८/२०२२ कलम ३०२, २०१, ३४ भादवी अन्वये गुन्हा नोंद करून गुन्ह्यातील आरोपी आकाश नागनाथ काळे (वय १९ वर्ष रा चिंचोली ब) व रोहीत रघुनाथ पोपळे (वय ३१ वर्ष रा चिंचोली ब) या दोघांना गातेगाव पोलीसांनी यांना अटक केली आहे. या दोघांना मा न्यायालयात हजर केले असता दि ०५.०८.२०२२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सपोनि अशोक घारगे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, एसडीपीओ सुनिल गोसावी साहेब यांच्या मार्गदर्शनात सपोनि अशोक घारगे, पोउपनि कांबळे, सफौ जाधव, पोहे राजगिरवाड, नाडे, गिरी, मोरे, तांदळे, पोलीस नाईक पाटील, मुळे, दाडगे, तपघाले आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!