वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध – संजय बोरा
दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात ११विच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : विज्ञान, कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असुन सीए ,सीएस, सीएमए, बँकिंग, इन्शुरन्स, अकाउंटंट, क्लार्क, कर सल्लागार व याशिवाय एक उद्योजक बनून ते स्वतः बरोबर समाजाला देखील रोजगाराच्या संधी निर्माण करून देऊ शकतात. तसेच त्यांनी बोधकथेच्या माध्यमातून प्रोत्साहन पर मार्गदर्शन करताना आपली स्पर्धा स्वतःशीच असली पाहिजे असे प्रतिपादन दयानंद शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष संजय बोरा यांनी येथे बोलताना व्यक्त केले ते लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील ११ वी च्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा बुधवारी आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शालेय समिती सदस्य व नियामक मंडळ सदस्य विशाल लाहोटी व विशाल अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम पवार ,कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यावेक्षिका डॉ. अंजली बुरांडे व समन्वयक प्रा. सुभाष मोरे आदी मंच्यावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अंजली बुरांडे यांनी केले. त्यांनी एचएससी बोर्ड परीक्षा २०२२ मधील निकालाचा गोषवारा सांगितला. तसेच महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या अभ्यासेतर उपक्रमांविषयी पालकांना माहिती दिली. प्रा.सुभाष मोरे यांनी महाविद्यालयात चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रम व वेळापत्रकाबाबत माहिती दिली तसेच सर्व प्राध्यापकांचा परिचय विद्यार्थी व पालकांना करून दिला. सीए व सीबी कोर्सेस ला शिकविणाऱ्या प्राध्यापकांचा देखील परिचय पालकांना करून देण्यात आला. या मेळाव्यात एच एस सी बोर्ड परीक्षेतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा, इयत्ता अकरावी परीक्षेतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा व चालू शैक्षणिक वर्षात अकरावी प्रवेशित पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजाराम पवार यांनी महाविद्यालयातील सुविधांचा व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.क्रांती तोडकर व प्रा. सुनिता नागरगोजे यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. ज्योती कुलकर्णी यांनी केले .या पालक मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.