पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौकातील डिजीटल बोर्डाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकार कड़क कायदेशीर कारवाई करा
सकल धनगर समाजाची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी
लातूर (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातील डिजीटल बोर्डाची तोडफोड कांही अज्ञात समाजकंटकांनी केली असुन त्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांचे विरुध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी – यांच्या नामफलकाची झालेली तोडफोड ही धनगर समाज बांधवांच्या अत्यंत भावना दुखावणारी आहे. या घटनेनंतर धनगर समाजातील बांधवांच्या भावना या अतिशय तिव्र असुन, दोषींवर त्वरीत कारवाई करत त्यांना अटक करून कडक कायदेशीर शासन करावे. अन्यथा धनगर समाज बांधावांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल धनगर समाजाचे संपतराव गंगथडे, मनोज अभंगे, अँड गोपाळ बुरबुरे, अँड आनंद खांडेकर, वाघे सुनिल, अँड.एच.एल. वैद्य, अँड. राजेश खटके, नामदेवराव गडदे, रंगनाथ बंडगर, नवनाथ कवितके, रामचंद्र मदने आदीनी दिला आहे.