लातूर पंचायत समितीच्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी नोंदवला उस्फूर्त सहभाग
२१७ जणांनी केले रक्तदान
लातूर (प्रतिनिधी) : ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत लातूर पंचायत समितीच्या वतीने दि. 4 आॅगस्ट वार गुरूवारी आयोजिलेल्या रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवत २१७ हून अधिक जणांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन लातूर चे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त सीईओ प्रभू जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, दत्तात्रय गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्या उपस्थितीत झाले.
रक्तदान शिबिरास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. शिबिरात पंचायत समितीतील सर्व अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रिय अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, संगणक परिचालक, मनरेगा, अंगणवाडी कर्मचारी, आशा बचत गट कार्यकर्ती, तसेच बाहेरील नागरिकांनी रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक गटविकास अधिकारी किरण कोळपे, प्रशासन अधिकारी चंद्रकांत कदम, गोविंद गंडाळे, विक्रम पुरी, कार्तिक बनसोडे, समाधान सारोळे, अविनाश जोगदंड, प्रभाकर कमले, नितीन सगर, विष्णू पोलकर व वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्याधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.