आय.आय.टी.जॅम व स्पर्धा परीक्षेसाठी संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी पाठीशी
दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी यांचे प्रतिपादन
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्था नामांकित शिक्षण संस्था असून या संस्थेचा प्रत्येक विद्यार्थी विविधांगी क्षेत्रात चमकला पाहिजे.या स्पर्धेच्या युगात आय.आय.टी. जॅमसारख्या स्पर्धा परीक्षेसाठी गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे आर्थिक मदत केली जाईल. विद्यार्थ्यांनी बी.एस्सी.पदवीचे शिक्षण घेत असतानाच अशा परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध करावी.अशा या परीक्षेसाठी उत्तम दर्जाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक यांची नेमणूक करून या परीक्षेत घवघवीत यश संपादन करावे यासाठी संस्था नेहमी पाठीशी राहील असे प्रतिपादन करण्याबरोबर ‘ हर घर तिरंगा ‘ या अभियानातही प्रत्येकांनी सहभागी व्हावे असे,आवाहन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी यांनी केले. ते येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात 5 ऑगस्ट रोजी रसायनशास्त्र व औद्योगिक रसायनशास्त्र विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आलेल्या आय.आय.टी. जॅम व इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी व संयुक्त सचिव सुरेशजी जैन,उपप्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे,कार्यक्रम समन्वयक व रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.युवराज सारणीकर, औद्योगिक रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आण्णाराव चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेने सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले – रमेश बियाणी
यावेळी संस्था सचिव रमेशजी बियाणी असे म्हणाले की, दयानंद शिक्षण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नीट,जेईई आदि परीक्षांप्रमाणे आय.आय.टी. जॅम व इतर स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी व प्राध्यापक यांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाईल.विद्यार्थ्यांनी आय.आय.टी.जॅम परीक्षेची बी.एस्सी.पदवी स्तरावर चांगली तयारी,अभ्यास करून आय.आय.टी.जॅम, एम.एस्सी.,पीएच.डी.इंन्टीग्रेटेड कोर्समध्ये प्रवेश घ्यावा.भरपूर वाचन, अभ्यास करून ज्ञान मिळवावे.कारण आपले जीवन नेहमी ज्ञानसमृद्ध असले पाहिजे. नवनवीन संशोधन केले पाहिजे. इंटरनेट, मोबाईलचा चांगला उपयोग केला पाहिजे.आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरविले पाहिजेत,असे ते म्हणाले.
यावेळी संयुक्त सचिव सुरेश जैन असे म्हणाले की,लातूर पॅटर्नमध्ये दयानंद विज्ञान महाविद्यालयाने उंच भरारी घेतली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हीच संस्थेची भूमिका आहे.विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धा परीक्षेत यश मिळवून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि भावी जीवन उज्ज्वल बनवावे असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.जयप्रकाश दरगड असे म्हणाले की,दयानंद विज्ञान महाविद्यालयातील या आय.आय.टी.जॅम व इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी घडतील.जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांची बी.एस्सी.पदवी स्तरावर चांगली तयारी करून घेऊन ते आय.आय.टी.जॅम एम. एस्सी.साठी पात्र होतील.आपले विद्यार्थी तेथे संशोधन करतील.या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक, वैज्ञानिक, फेलोज, भटनागर ॲवॉर्डी यांचे मार्गदर्शन दिले जाईल.पदवी स्तरावरील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन केंद्राचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले.
प्रास्ताविकात डॉ.युवराज सारणीकर यांनी सदरील स्पर्धा परीक्षेची माहिती सांगितली तर आभार प्रा.बळीराम कामाळे यांनी मानले.सूत्रसंचालन ऋतुजा म्हेत्रे यांनी केले. याप्रसंगी डॉ.श्याम इबाते, डॉ.रवींद्र शिंदे, डॉ.नंदिनी कोरडे, डॉ.जमन अंगुलवार, डॉ.श्रेयस माहुरकर, प्रा.राहुल जाधव, डॉ.नाथराव केदार, डॉ.ईन्नूस पठाण, डॉ.महादेव पंडगे, प्रा.अमोल सांजेकर, डॉ.रामशेट्टी शेटकार, प्रा.नवनाथ ढेकणे, डॉ.तांबोळी प्रा.अक्षता माने, प्रा.मनीषा मुंडे, प्रा.भाग्यश्री काळे, प्रा.नितळे, प्रा.पाटील, अक्षय कुलकर्णी, रवींद्र बाजपाई, शंकर सूर्यवंशी, राजेसाहेब पांचाळ, हरिओम पाटोळे, राम बिर्ले यांच्यासह आदि प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.