मनविसे वर्धापनदिन सप्ताह निमित्त लातूर जिल्ह्यातील दयानंद, जय क्रांती, क्कॉक्सिट आणि शिवाजी महाविद्यालय युनिट स्थापनेचा जल्लोषात शुभारंभ…
लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा १६ वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपुर्ण महाराष्ट्रात दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान महाविद्यालय युनिट शुभारंभ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि मनविसे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व मनसे प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांच्या सूचनेनुसार आज लातूर शहारातील दयानंद महाविद्यालय जय क्रांती महाविद्यालय कॉक्सिट महाविद्यालय आणि शिवाजी महाविद्यालय रेणापूर येथील मनविसे युनिटचे उद्घाटन मनविसे महाराष्ट्र सरचिटणीस मा. राजीव जावळीकर यांच्या शुभ हस्ते व मनविसे जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष भागवत शिंदे मनसे शहराध्यक्ष मनोज अभंगे मनसे जिल्हा सचिव रवी सुर्यवंशी मनविसे शहराध्यक्ष बालाजी कांबळे मनसे शहर संघटक वैभव जाधव मनसे वाहतूक सेना जिल्हध्यक्ष वाहेद शेख मनविसे जिल्हा सचिव चंदू केंद्रे मनविसे शहर सचिव अजिंक्य मोरे मनविसे शहर सचिव योगेश डोंगरे मनविसे तालुकाध्यक्ष विशाल कातळे मनविसे पदाधिकारी योगेश सुर्यवंशी ध्रुव महापूरकर, श्रीनाथ ध्रुवे तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिकांच्या उपस्थितीत अत्यंत जल्लोषपुर्ण वातावरणात संपन्न झाले.
महाराष्टातील अनेक विद्यार्थी तरुण तरुणींचा अमित साहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील विद्यार्थी संवाद दौऱ्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे व असंख्य विद्यार्थी मोठया सख्येने मनविसेकडे आकर्षित होत आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध समस्या, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनातील विश्वासू नेतृत्व म्हणून अमित साहेब ठाकरे यांच्याकडे आज पाहत आहेत. येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही महाराष्ट्रातील अतिशय प्रबळ विद्यार्थी संघटना म्हणून ओळखली जावी यासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांनी अत्यंत प्रभावशाली कार्य करावे असे आवाहन अमित साहेब ठाकरे यांनी केले.
मनविसे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत लातूर शहरात आणि रेणापूर तालुक्यात मनविसे युनिट स्थापन करण्यात आले. दयानंद महाविद्यालय युनिट अध्यक्ष शिवप्रसाद जिडगे जय क्रांती महाविद्यालय युनिट अध्यक्ष संदेश हुलगुंडे कॉक्सिट महाविद्यालय युनिट अध्यक्ष अभिषेक पवार तसेच रेणापूर तालुक्यातील शिवाजी महाविद्यालय युनिट अध्यक्ष दिपक गवळी यांची निवड करण्यात आली.
यावेळी युनिट स्थापनेच्या यशस्वीतेसाठी योगेश डोंगरे विराज कुलकर्णी विवेक कलवले ध्रुव महापूरकर श्रीनाथ ध्रुवे सूरज देडे तसेच मनविसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक यांनी परिश्रम घेतले.