लातुर जिल्हा परिषदेचा महाप्रताप; ग्रामविकास अधिकाऱ्यावर केला अन्याय?
निलंगा (प्रतिनिधी) : लातुर जिल्हा परिषदेच्या एका चुकीमुळे एका ग्रामविकास अधिकाऱ्यावर अन्याय झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निलंगा पंचायत समिती येथील कार्यरत ग्रामविकास आधिकारी पी एन हणमंते यांची जिल्हा परिषद लातुर यांचेकडून सेवार्थ माहिती भरीत असतांना त्यांच्या जन्म तारखेची नोंद चुकीची लावली गेली असल्याने त्यांची सेवा आणखीन दोन वर्षे शिल्लक असतांना दोन वर्षे आगोदरच अर्थात मे २०२२ ला पेंशन वर दाखवण्यात आले आहे. वास्तविक पाहता पीडित ग्रामविकास आधिकरी पी एन हणमंते यांची खरी जन्म तारीख ०८ मे १९६६ असतांना सेवार्थ माहिती भरतांना जिल्हा परिषदेच्या सबंधीत विभागातील सबंधीताकडून त्यांच्या जन्म तारखेची नोंद ०८ मे १९६४ घेण्यात आली. घेण्यात आलेली नोंद ही जाणीवपूर्वक घेण्यात आली की नजरचुकीने घेतली गेली? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. या प्रश्नाचे उत्तर नैतिकतेच्या दृष्टीने जिल्हा परिषद लातूर देईल का? ग्रामविकास अधिकाऱ्यावर झालेला अन्याय व दोन वर्षे शिल्लक असलेली सेवा त्यांना पुन्हा परत प्राप्त होईल काय? दोन वर्षाचे त्यांचे होत असलेले नुकसान(आर्थिक) भरून निघेल काय? या अश्या अनेक प्रश्नाचे उत्तर हणमंते यांना मिळत नसल्याने या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी स्वेच्छा निवृत्तीची मागणी केलेली आहे. मागील काळात त्यांनी अहमदपूर, औसा, निलंगा परत निलंगा या तालुक्यात त्यांनी चोख सेवा बजावली आहे. याबाबत आता लातुर जिल्हा परिषद काय निर्णय घेईल ? व काय न्याय देईल असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे.