प्रहार जनशक्ती पक्षाच्या लातूर उप – जिल्हाप्रमुख पदी विनोद तेलंगे

प्रहार जनशक्ती पक्षाच्या लातूर उप - जिल्हाप्रमुख पदी विनोद तेलंगे

उदगीर : येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे उप-जिल्हाप्रमुख विनोदभाऊ तेलंगे यांच्या कामाची दखल घेउन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, तथा माजी
राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष – अनिलजी गांवडे , महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोदभाऊ कुदळे , महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांनी
प्रहार जनशक्ती पक्षाच्या लातूर उप-जिल्हाप्रमुख पदी पुन्हा एकदा निवड लातूर जिल्हा आढावा बैठकीत करण्यात आली आहे.
विनोद तेलंगे दोन वर्षोंपासुन प्रहार जनशक्ती पक्षाचे उप-जिल्हाप्रमुख पदावर काम करत असताना उदगीर शहरात व तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे गाव तिथे शाखा ,शाखा तिथं कार्यकर्ते करत पक्षाची ताकद वाढविन्याचे प्रयत्नं केले.
त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी लातूर महिला आघाडी ग्रामीण जिल्हाप्रमुख-काचंन भोसगे ,उप-जिल्हाप्रमुख-प्रेमलता भंडे, उदगीर महिला आघाडी तालुकाध्यक्ष-विजयमाला पवार,
उदगीर तालुकाध्यक्ष -रविकिरण बेळकुंदे, उदगीर-जळकोट मुख्य संघटक-बंडेप्पा पडसलगे,उदगीर तालुका कार्याध्यक्ष-महादेव आपटे,चंद्रकांत चिलरगे,पदाधिकारी व प्रहारसेवक उपस्थित होते.

About The Author