सर्व रोग निदान व रक्तदान शिबिर संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील सुकणी येथे सर्व रोगनिदान व रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन राहुल केंद्रे माजी जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्तेझाले,या प्रसंगी प्रमुख पाहुणे अमोल निडवदे अध्यक्ष युवा मोर्चा महाराष्ट्र भाजपा,बळवंत चिंचोलकर उपस्थित होते.
सर्वरोग निदान शिबिरांचे नियोजन डॉ.शेटकार ,डॉ. विजय बिराजदार , डॉ सुरनर ,डॉ.प्रशांत नवटके, गणेश जोगदंड,तिवारी सुरेश यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी एकूण 92 लोकांचे मधुमेह, रक्तदाब व डोळ्यांची तपासणी करण्यात आली.यामध्ये 22 मधुमेही, 26 रक्तदाबांची रुग्ण आढळून आले, तर डोळ्यांचे शस्त्रक्रियेसाठी14 लोकांना मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.या शिबिरामध्ये 22 जणांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाचे नियोजन सचिन पुरी,अनिल बिरादार, सिद्धू शेटकार,तुषार ठोणे, ऋषिकेश मुंडे व सुकणी मित्र मंडळ यांनी केले होते ,तर मधुमेही व रक्तदाबांची तपासणी नवीन शृंगारे,स्वप्निल फुलारी यांनी केली.