महात्मा फुले महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अतिशय महत्त्वाचा ठरलेला दिवस म्हणजेच ९ ऑगस्ट १९४२. या दिवशीच महात्मा गांधी यांनी इंग्रजांना “चले जाव” असा इशारा दिला आणि “छोडो भारत ” चळवळीला प्रारंभ झाला. या दिवसाची आठवण म्हणून संपूर्ण देशभर ९ ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात येतो. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ऑगस्ट क्रांतीच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष पाटील यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.डी.डी. चौधरी, डॉ.पांडुरंग चिलगर, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. मारोती कसाब, डॉ. प्रकाश चौकटे, प्रा. आतिश आकडे, डॉ. प्रशांत बिरादार, कार्यालयीन प्रमुख प्रशांत डोंगळीकर, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.