महात्मा फुले महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ च्या उपक्रमाची जय्यत तयारी

महात्मा फुले महाविद्यालयात 'हर घर तिरंगा' च्या उपक्रमाची जय्यत तयारी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाची प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी झाली असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी दिली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक १३ ते १५ऑगस्ट २०२२ या दरम्यान शासनाच्या आदेशान्वये ‘हर घर तिरंगा ‘ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबतची पूर्ण तयारी महाविद्यालयाने केली असून सर्व प्राध्यापकांनी तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी आपला राष्ट्राभिमान जागृत ठेवून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणारा आहे. यासाठी महाविद्यालयातील क्रीडा संचालक डॉ.अभिजीत मोरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे, उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा ‘ हा उपक्रम यशस्वी करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणार आहेत.

About The Author