महाकवी कालिदासांच्या साहित्यावर महात्मा फुले महाविद्यालयात आज आंतरराष्ट्रीय ई -चर्चासत्राचे आयोजन

महाकवी कालिदासांच्या साहित्यावर महात्मा फुले महाविद्यालयात आज आंतरराष्ट्रीय ई -चर्चासत्राचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : संस्कृत भाषेचे आद्य कुलगुरू महाकवी कालिदास यांच्या जीवन आणि साहित्यावर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या वतीने गुरुवार दि. ११ ऑगस्ट २०२२ रोजी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी दिली.

याबाबतचे अधिकृत असे की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रम घेतले जात असून त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी ( दि. ११) सायंकाळी ठीक पाच वाजता गुगल मीट आणि युट्यूब या प्लॅटफॉर्मवर हे एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न होत आहे. महात्मा फुले महाविद्यालयाचा संस्कृत विभाग, विश्व संस्कृत मंच, महाराष्ट्र आणि नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन केले असून या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य तथा ज्येष्ठ लेखक डॉ. वसंत बिरादार पाटील हे भूषविणार आहेत. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी उद्घाटक म्हणून नेदरलँड येथील हिंदी युनिव्हर्स मंडळाचे अध्यक्ष या राहणार असून प्रमुख पाहुण्या म्हणून साहित्य अकादमी विजेत्या लेखिका व वर्ग एक राजपत्रित अधिकारी डॉ. मंजुषा कुलकर्णी व सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचे डॉ. राजेश कुमार मिश्र, नंदी फाऊंडेशन नांदेड येथील डॉ.शशिकांत दरगू हे उपस्थित राहणार आहेत.

आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात देश विदेशातील अभ्यासक आपले शूद्रिबंध सादर करणारा असून या चर्चात सत्रात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, संयोजक संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार , महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी आणि सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी केले आहे.

About The Author