राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३,४२,४०० रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ३,४२,४०० रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त

लातूर (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूरचे प्रभारी अधीक्षक अभिनित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यरंडी ते सारोळा रोड, ता. औसा, जि. लातूर या ठिकाणी दि. १० आॅगस्ट २०२२ रोजी अवैधरित्या विनापरवाना गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे वाहतूक करीत असतांना चारचाकी वाहनाचा पाठलाग करुन पकडण्यात आले. सदर गुन्हयामध्ये ७५० x ८ गोवाराज्य निर्मित विदेशी मद्याचे बॉक्स व एक शेवरोले कंपनीची चारचाकी कार क्र. MH १२-NX-८११३ व तसेच ४०० बुचे असा एकूण ३, ४२, ४००/- (तीन लाख बेचाळीस हजार चारशे पन्नास रुपये) इतका अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हयामध्ये शरद रामराव पवार, वय ३३ वर्षे, रा. उदगीर, जि. लातूर याला अटक करण्यात आली.

सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क चे प्रभारी अधीक्षक अभिजित देशमुख, निरीक्षक आर. एम. बांगर, आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक –  एल. बी. माटेकर, अमोल शिंदे, अमोल जाधव, स्वप्नील काळे, सहाय्यक दुव्यम निरीक्षक गणेश गोले, जवान अनिरुद्ध देशपांडे, हनुमंत मुंडे, संतोष केंद्रे, सुरेश काळे यांनी सहभाग नोंदविला. पुढील तपास लातूर दुय्यम निरीक्षक ए. के. शिंदे हे करित आहेत.

अवैध मद्यविक्री विरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार असून, अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक व या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नांव गुप्त ठेवले जाईल असे अभिजित देशमुख, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांनी सांगून अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

About The Author