माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या कडून सोयाबीन पीक नुकसानीची पाहणी

माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या कडून सोयाबीन पीक नुकसानीची पाहणी

हेर (प्रतिनिधी) : हेर येथे अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन पीकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. म्हणून माजी आ.सुधाकर भालेराव यांनी हेर व परिसरातील पिकांची पाहणी केली.हेर व परिसरातील भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. हेर महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य परिस्थीती निर्माण होऊन ८२ मीमी पाऊस पडला आहे. यामुळे वावरेच्या वावरे पाण्याखाली येऊन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मा.आ.भालेराव व टिमने शिवारातील नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यामार्फत आपल्या भागात प्रचंड नुकसान झाले आहे म्हणून शंभर टक्के नुकसानीचा शासनास अहवाल पाठवून शंभर टक्के नुकसान म्हणून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून लातूर जिल्ह्यातील उदगीर व जळकोट मतदार संघात शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे भालेराव म्हणाले.यावेळी धर्मपाल नादरगे, दिलीप मजगे, शंकर रोडगे, बसवराज रोडगे, शिवाजी भोळे, लक्ष्मण जाधव, माधव टेपाले, चेअरमन संगमेश्वर मिटकरी, सुधाकर गुरूडे,शेषीकांत मरलापल्ले,भरत तुरेवाले, राजकुमार तंवडे, मधुकर मरलापल्ले, संभाजी सूर्यवंशी,या पदाधिकाऱ्यासह उपसरपंच तुळशिराम बेंबडे,अविनाश सुर्यवंशी, राम कदम, बालाजी गुराळे,आदीसह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थीत होते.

About The Author