रोटरी क्लबच्या वृक्षदिंडीने उदगीरकरांचे लक्ष वेधले
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य, राजराजेश्वरी मंदिर परिसरात वृक्षारोपण
उदगीर (ता.प्र.) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रोटरी
क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या
वतीने आयोजित करण्यात
आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास
शहरातील विविध शाळा
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी
उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या
विद्यार्थ्यांच्या मदतीने जवळपास
दोन हजार वृक्षांची लागवड
राजराजेश्वरी मंदिर परिसरात
करण्यात आली. दरम्यान
वृक्षारोपणाच्या अगोदर शहरातून
काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीने
शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून
घेतले.
रोटरी क्लब ऑफ
उदगीर सेंट्रलच्या वतीने शहरातील
विविध शाळा महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत
पर्यावरणाचा संदेश देणारी वृक्षदिंडी
बुधवारी सकाळी शिवाजी चौक ते
नाईक चौकापर्यंत काढण्यात
आली. या वृक्षदिंडीमध्ये कारवा फाउंडेशन, ग्रीन उदगीर मिशन, रोटी कपडा बँक, संघर्ष मित्र मंडळ, श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ, गोरक्षण संस्था, कर्मा फाउंडेशन सह अनेक सामाजिक संस्था सहभागी झाले होते. या वृक्षदिंडीत कर्मवीर भाऊराव पाटील सैनिक स्कुल, शिवाजी महाविद्यालय, विद्द्यावर्धिनी हायस्कूल, विद्यावर्धिनी इंग्लिश स्कुल, श्री हावगीस्वामी महाविद्यालय, माउंट लिटरा झी स्कुल, टाइम्स पब्लिक स्कुल, अक्षरनंदन शाळा, आदर्श स्कुल, सरदार वल्लभभाई पटेल शाळा, लालबहादूर शास्त्री शाळा, उदयगिरी महाविद्यालय, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, जयहिंद पब्लिक स्कुल, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय, पोस्ते पोद्दार स्कुलचे विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते.
सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी झाडांची
लागवड करणारे संदेश देणारे
फलक हाती घेवून विविध घोषणा
दिल्या. विद्यार्थ्यांच्या या आकर्षक
अशा दिंडीमुळे शहरातील
नागरिकांमध्ये वृक्षारोपणाची
करण्यासंदर्भात
लागवड
यानिमित्ताने जाणीवजागृती
करण्यात आली. वृक्षदिंडीच्या
समारोपानंतर रोटरी क्लबच्या
वतीने उपविभागीय अधिकारी
प्रवीण मेंगशेट्टी व तहसीलदार
रामेश्वर गोरे यांच्या हस्ते
राजराजेश्वरी मंदिर परिसरात
वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शहरातील विविध शाळा
महविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या
वृक्षारोपणाच्या उपक्रमात आपला
सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास माजी
नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे,
समाजसेवक रमेश अंबरखाने,
बाजार समितीचे उपसभापती
रामराव बिरादार येणकीकर, डॉ.
संग्राम पटवारी, रोटरी क्लब ऑफ
उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष रामेश्वर निटूरे,
सचिव व्ही.एस. कणसे, किशोर
पंदिलवार, उपाध्यक्षा ज्योती चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन डॉ.
संतोष पांचाळ, वनपरिक्षेत्र
अधिकारी अश्विनी अपेट, विद्या
अवधूतराव, वन परिमंडळ
अधिकारी रामेश्वर केसाळे,
धन्वंतरी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्ता
पाटील टाकळीकर, मंडळ
अधिकारी गणेश हिवरे, जिव्हाळा
ग्रुपचे अध्यक्ष देविदास नादरगे,
महानंदा सोनटक्के, प्रा. मंगला
विश्वनाथे, सरस्वती चौधरी,
अन्नपुर्णा मुस्तादर, सुनीता मदनुरे, प्रा. सुनीता चवळे, विजयकुमार
पारसेवार, प्रशांत मांगुळकर, प्रमोद
शेटकार, रविंद्र हसरगुंडे, संतोष
फुलारी, संदीप मोदी, सुदर्शन मुंडे, राजेश महाजन, गजानन
चिद्रेवार, नागेश अंबेगावे, विशाल
जैन, डॉ. सुधीर जाधव, बाळू पारसेवार, अॅड. मंगेश
साबणे, आशिष अंबरखाने, प्रवीण चंडेगावे, डॉ. एस.
आर. श्रीगिरे, अनिल मुळे, डॉ. शीतल जाधव, व्ही. एस. कुलकर्णी, राम मोतीपवळे, विक्रम हलकीकर, सायली पारसेवार,
ग्रीन उदगीर मिशनचे अहमद
सरवर, रोटरॅक्ट क्लबचे सुयोग
कोटलवार, तेजस अंबेसंगे, यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी, पर्यावरण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित
होते.