समाजासाठी विविध रूपात सेवा बजावणाऱ्या कष्टकऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरा

समाजासाठी विविध रूपात सेवा बजावणाऱ्या कष्टकऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरा

उदगीर (प्रतिनिधी) : लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीर येथे रक्षाबंधन हा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा व संस्कृत दिन या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड, प्रमुख अतिथी प्रभाकर बनसोडे, ज्योती हंचनाळे,तसेच पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर, लालासाहेब गुलभिले,माधव मठवाले, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख , बालाजी पडलवार,विनायक इंगळे उपस्थित होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख अतिथी श्री प्रभाकर बनसोडे म्हणाले, ” बहीण भावाच्या अतूट बंधनाची साक्ष देणारा हा सण आहे. सणाचे महत्व व संस्कृत विषयाचे महत्त्व विशद केले.
ज्योती हंचनाळे यांनी संस्कृत अत्यंत महत्वाची भाषा असून त्याचे महत्व सांगून रक्षाबंधनाचे महत्व सांगितले.अध्यक्षीय मनोगतात अंबादास गायकवाड यांनी रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन मनीषा पाटील, प्रास्ताविक मीनाक्षी कस्तुरे, स्वागत व परिचय निता मोरे व आभार संघप्रिया गायकवाड यांनी मानले. विद्यार्थ्यांनी परस्परांना राख्या बांधल्या. समाजाचे आपणहि काहीतरी देणे लागतो म्हणून सेवावस्तीत तसेच ऑटो चालक, फळ विक्रेते, गॅरेजवर काम करणाऱ्या बांधवांना राख्या बांधून त्यांच्या प्रति बंधुभाव जपत भारतीय सण उत्सवाचे महत्त्व वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला.मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीषा पाटील, मिनाक्षी कस्तुरे, निता मोरे,विनायक इंगळे, संदीप बोधनकर, केरबा नेमट, सचिन येतोंडे यांनी प्रयत्न केले.

About The Author