नान्नज येथील विश्वस्तांचा शेकापूर येथे सत्कार

नान्नज येथील विश्वस्तांचा शेकापूर येथे सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील मौजे शेकापूर येथे जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या वतीने 37 रुग्णवाहिका महाराष्ट्रात वाटप करण्यात आल्या, त्यापैकी एक उदगीर परिसरासाठी देण्यात आली आहे. गोरगरिबांना मोफत सुविधा उपलब्ध व्हावी. हा या मागचा उद्देश असल्याचे विश्वस्त मंडळांनी सांगितले.

शेकापूर येथील सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलारी यांनी संभाजी कोनाळे, गोपाल सावंत, मंदाबाई मुरलीधरराव वाडेकर, हनुमंत सावंत, लिंबाजी मोरखंडे, भगवान जगताप, नंदू शेल्हाळे, माधव पाटील, जनार्दन सावंत, नाना जगताप, सतीश हरकरे इत्यादी मान्यवरांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले. तसेच जगद्गुरु नरेंद्र महाराज यांनी गोरगरिबांचा विचार करून रुग्णवाहिका परिसरासाठी दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!