तालुका पत्रकार संघाच्या वतीने बामणी येथे वृक्षारोपण संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील मौजे बामणी येथे पर्यावरणाचा समतोल टिकून राहावा, या दृष्टीने उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. केवळ वृक्षारोपणच नव्हे तर वृक्ष संवर्धनाची ही जबाबदारी पत्रकार संघाने घेतली आहे. एक आदर्श गाव बनवण्यासाठी बामणी या गावाला पत्रकार संघाने दत्तक घेतले आहे. अशी माहिती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ मोतीपवळे यांनी दिली.
याप्रसंगी सरपंच राजकुमार बिरादार, सोसायटीचे उपचेअरमन विजयकुमार पाटील, काशिनाथ बिराजदार, डॉ. धनाजी कुमठेकर, दादाराव इंचुरे, सुनील पाटील, माधव बिराजदार ,दिलीप कवठाळे, लोकेश कारभारी,शिवदास गंगापुरे ,योगेश बिराजदार,ग्रामसेवक संजीव गुरमे, विवेक होळसंबरे, मुरली लासुर, राम इंचुरे, विनय तानाजी पाटील, रामचंद्र कांबळे, तुकाराम सूर्यवंशी, बालाजी नर्सिंग कांबळे, बाळासाहेब बिराजदार, कुलकर्णी व्ही एस, रवींद्र हसरगुंडे, नागेंद्र साबणे, प्रभुदास गायकवाड, अशोक तोंडारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना रामभाऊ मोतीपुळे म्हणाले की, ग्रामस्थांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणासोबतच नैतिक जबाबदारी म्हणून प्लास्टिकचा वापरही टाळावा. तसेच गावच्या विकासासाठी सर्वांनी हातभार लावावा. सर्वांच्या सहकार्यातूनच गावचा विकास होईल, अशी खात्रीही त्यांनी याप्रसंगी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार बिराजदार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. धनाजी कुमठेकर यांनी व्यक्त केले.