स्वास्थ रक्षणासाठी आयुर्वेद औषधोपचार व पंचकर्म चिकित्सा उपयुक्त आहे – आ. बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील डॉ. संतोष देवकते यांच्या श्री विश्वरत्न मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म उपचार केंद्राचे 18 डिसें रोजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हास्ते उदघाटन झाले.निरोगी रहाण्यासाठी व दीर्घकालीन आजारांवर आयुर्वेद औषधी व पंचकर्म उपचार उपयुक्त आहेत.सर्वांनी आयुर्वेद औषधोपचार घ्यावेत असे उदघाटन प्रसंगी आमदार बाबासाहेब पाटील यांनी आपले मत व्यक्त केले यावेळी डॉ.अनिकेत तळेगांवकर यांनी आयुर्वेद शास्त्राबद्दल माहिती दिली.
आयुर्वेद हे भारतीय प्राचीन शाश्वत शास्त्र आहे.सर्व रोगांचे मुळ कारण मंदाग्नी आहे.आयुर्वेद औषधोपचार व पंचकर्म चिकित्सेच्या साहाय्याने मधुमेह, रक्तदाब,हृदयविकार,त्वचारोग,
पित्ताचे आजार, स्त्रीरोग, रक्तप्रदर, गर्भाशयाचे विकार, ई. आजार ठिक होऊ शकतात.
शिवानंद हेंगणे, सांबप्पा महाजन, अश्विनीताई कासनाळे, अनुराधा नळेगांवकर, डॉ. निलेश मजगे, डॉ. उमाकांत गाढवे, डॉ. गजानन साखरे, सचिन प्यादेकर मान्यवर उपस्थित होते.
श्री विश्वरत्न मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म उपचार केंद्र, HDFC बँक च्या समोर, अहमदपूर येथे 20 व 21 डिसेंबर 2020 रोजी सर्व रोग निदान व मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबीरात जवळपास ५० जणांची मोफत तपासणी करण्यात आली