जीवनामध्ये गणित विषयाला अनन्य साधारण महत्त्व आहे – गणेश हाके
अहमदपूर (गोविंद काळे) : ज्या व्यक्तीचा गणित विषय पक्का असतो त्या व्यक्तीचे जीवन पक्के असते.तसेच गणित विषयाचा सर्व विषयाशी संबंध आहे म्हणून जीवनामध्ये गणिताला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे मत संस्थाध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी व्यक्त केले.
ते संत ज्ञानेश्वर विद्यालयात गणित दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आशा रोडगे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून गणित शिक्षक सुरेश वट्टमवार,मीना तोवर, सह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना गणेश हाके म्हणाले की, व्यवहारांमध्ये गणित फार महत्वाचे आहे. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत गणित विषयाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंध असतोच. म्हणून विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच गणिताचा चांगला अभ्यास केला पाहिजे.तसेच सुरेश वट्टमवार सर यांचे मार्गदर्शन पर भाषण झाले.अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रामानुजन गणित तज्ञ स्पर्धा परीक्षेत गोल्ड मेडल व प्रमाणपत्र प्राप्त संकर्षण पलमटे, ओमकार कज्जेवाड, गार्गी नळेगावकर, श्रावणी भंडे, तन्वी पस्तापुरे,आयुष पौळ, गणेश भरडे, सुजल पन्हाळे, नागेश उगिले, प्रेम होळंबे, अनुराधा गुट्टे या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना तोवर यांनी केले तर सूत्रसंचालन संगीता आबंदे पाटील यांनी केले.आभार सतिष साबणे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास ऑनलाईन व ऑफलाईन विद्यार्थी व पालक उपस्थित होते.