नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज ची वार्षिक आढावा बैठक संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : मोरगाव बारामती येथे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस एन डी एम जे या सामाजिक संघटनेचे वार्षिक आढावा बैठक संपन्न झाली. ही बैठक संघटनेचे महाराष्ट्र महासचिव अॅड डॉ केवल उके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये संघटनेच्या माध्यमातून वर्षेभर केलेला आढावा व लाॅकडाऊनच्या काळात केलेल्या कामाचाही आढावा घेण्यात आला व नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज च्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.तसेच राज्याचे सचिव वैभव गिते यांनी वर्षभरात लॉकडाऊन च्या काळामध्ये सामाजिक हिताचे संघटनेने व कार्यकर्त्यांनी कोणकोणती कामे केली याचा आढावा घेतला. त्यामध्ये अत्याचार पीडितांचे प्रश्न असतील, असंघटीत कामगारांचे प्रश्न असतील, दिव्यांगांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील बांधकाम मजुरांचे प्रश्न असतील कार्यकर्त्यांच्या अडी अडचणी असतील या वर्षीच्या गाव स्तरीय तालुकास्तरीय जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती तसेच गाव तीथे शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच वर्षभरात चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्य कार्यकारणी पदाधिकारी अॅड डॉ केवजी उके, वैभवजी गीते प्रा रमाताई अहिरे, अँपल खरात, प्रमोद शिंदे, बी पी लांडगे, बौध्दीसत्व फाऊंडेशनचे संस्थापक राजेंद्र कांबळे, निवृत्ती तात्या रोकडे, पंचशीलाताई कुंभारकर, महानंदाताई डाळिंबे, शशी खंडागळे, शरद शेळके,दिलीप आदमाने, संजय माकेगावकर, संजय झेंडे,बाबासाहेब सोनवणे, दादा जाधव, वर्षा शेरखाने, लातूर जिल्हाध्यक्ष सावन सिरसाठ, पूणे जिल्हाध्यक्ष डॉ. बाबासाहेब सोनवणे, विनोद रोकडे , सचिन मोरे. तसेच पुणे, सातारा, सांगली सोलापूर लातूर उस्मानाबाद रायगड मुंबई कल्याण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, येथील कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांचे आभार पूणे जिल्हाध्यक्ष डॉ बाबासाहेब सोनावने यांनी मांडले.