कोरोना काळात पाच एकरवर फुलविली पाले भाज्याची शेती
सताळा गावचे माजी सरपंच रघुनाथ महाळंकरांचा युवक शेतकर्यासमोर अादर्श.
अहमदपुर (गोविंद काळे) : कोरोनाच्या महामारीच्या काळात संपुर्ण जग ताळेबंद असताना प्रत्येक नागरिक अापला जीव वाचवण्यासाठी घरांच्या चार भिंतीत बंदिस्त झाला होता.कोरोनाने देशातीलच नव्हे तर जगभरातील उद्योगधंदे,शिक्षण,वाहतुक व दळणवळण ठप्प झाले असताना जगाचा पोशिंदा शेतकरी माञ प्रामाणिकपणे काळ्या अाईची अाणि देशातील लोकांची सेवा अन्नधान्य अाणि पालेभाज्या फळांचे पिक घेवुन करत होता.
अशीच एक प्रेरणादेणारी अाणि सुशिक्षीत बेरोजगारांनी अादर्श घ्यावा अशी घटना अहमदपुर तालुक्यातील सताळा गावचे माजी सरपंच रघुनाथराव महाळंकर यांची अाहे.रघुनाथ महाळंकर हे मुळात उपक्रमशिल, अाधुनिकतेला महत्व देणारे असुन त्यांनी अापल्या दोन्ही मुलांचे शिक्षण नामांकित संस्थेत केले अाहे. सताळा गावचा सरपंच पदाचा कार्यकालही अापल्या नाविण्यपुर्ण कार्याने गाजवला अाहे.कोरोना काळात त्यांची दोन्ही मुलं शाळेला सुट्टी असल्याने गावी अाली होती व घरात बसुन कंटाळुन गेलेल्या मुलांनी अापले वडील रघुनाथरावांना पालेभाज्यांची शेत करण्याची कल्पना सुचवली अाणि ती लागलीच सत्यात उतरवण्यासाठी वडील व मुले यांनी प्रयत्नही केले.त्यांनी अापल्या सर्व शेती पैकी पाच एकर शेतीचा प्लाॅट हा पालेभाजी घेण्यासाठी तयार केला.कमीतकमी पाण्यामध्ये येणारी भाजीपाल्याची पिके घेण्यास सुरुवात केली.त्यांना यासाठी पुण्याचे मार्गदर्शक मिलींदजी भोर यांनी योग्य मार्गदर्शन केले.त्यांनी कोरोना काळात शेतात मिरची, कोतींबर, मेथी, शेपु,वांगे, दोडका अशी पालेभाजीची पिके घेतली.सध्या त्यांच्या या प्लाॅटमध्ये अाडीच एकर वांगी, अाडीच एकर मिरची व पंधरा गुंठे रानात दोडका अाहे. या साठी त्यांना जवळपास दोन लाख रुपये खर्च अाला असुन अातापर्यंत त्यांचे तीन लाखांचे उत्पादन झाले असुन येणार्या काळात दहा त पंधरा लाख रुपये यातुन उत्पन्न होण्याची अपेक्षा अाहे. कोरोनाच्या या नऊ महीन्याच्या काळात रघुनाथ महाळंकर यांनी जवळजवळ पंधरा विस लाखांचे उत्पादन घेतले असुन येणार्या दोन महीन्यात पंधरा लाख रुपये उत्पन्न मिळण्याची त्यांची अपेक्षा अाहे.
रघुनाथ महाळंकर यांनी सताळा व पंचक्रौशीतील अल्पभुधारक शेतकरी,सुशीक्षीत बेरोजगार व नाविण्यपुर्ण शेतीत प्रयोग करु इच्छीनार्या शेतकरी वर्गांसाठी अादर्श निर्माण करुन दिला अाहे.कारण जर शेतकरी नगदी पिके घेत राहीला तर शेतकर्याची अर्थीक परिस्थीती बदलू शकते व प्रचंड प्रमाणात होत असलेल्या शेतकर्यांच्या अात्महत्यांना अाळा बसु शकतो.नगदी पिके घेतल्याने शेतकर्याकडे दररोजचा पैसा येईल व त्याचे होणारे अर्थीक हाल थांबेल. रघुनाथ महाळंकर हे उपक्रमशिल सरपंच म्हणुनही त्यांची प्रतिमा तालुक्यात अाहे कारण त्यांनी त्यांच्या काळात सताळा येथे नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, मोफत पिठाची गिरणी, पिण्याचे शुध्दपाणी,हायमस्ट लाईट, सांस्कृतीक सभागृह अशी एक ना अनेक कामे केलेली अाहेत. रघुनाथ महाळंकर यांनी त्यांच्या प्रयोगशील शेतीची माहीती इतरांना मिळावी व परिसरातील शेतकर्यांनी त्यांच्या प्रमाणे नगदी पिके घ्यावीत या उद्देशाने त्यांनी शेतात स्नेह भोजनाचे अायोजन केले होते. या स्नेहभोजन व उपक्रमशील शेतकर्याच्या कामाची मेहनतीची दखल घेण्यासाठी अहमदपुर चाकुर विधान सभेचे सदस्य माजी अामदार बब्रुवानजी खंदाडे, जिल्ह्याचे मोठे अाडत व्यापारी सुरेशजी मालु,सताळा गावचे माजी सरपंच दामोदर कांबळे, सोसायटीचे चेअरमन रामराव शिंदे व्हाइस चेअरमन राजाभाऊ खंदाडे,सिध्दार्थ सुर्यवंशी,पंचायत समिती सदस्य नागनाथराव खंदाडे,माजी चेअरमन नरसिंगराव महाळंकर,सुरेश जाधव,माजी उपसभापती निळकंढ होनराव,धनराज साखरे,बालाजी खंदाडे,ज्ञानोबा महाळंकर, गणपत ढवळे, भरत चंदे, मुदगलराव खंदाडे, रामराव ढवळे, दत्ता खंदाडे, वर्धमान उळागड्डे, अावाज बहुजनाचा चॅनलचे शिवाजी गायकवाड, पोलीस फ्लॅशचे गोविंद काळे व दैनिक दंडाधिकारचे पञकार बाबासाहेब वाघमारे व गावातील अनेक शेतकरी नागरीक उपस्थीत होते.