अहमदपूरच्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा निवडणूक निर्णय अधिकारी मा मंजुषा लटपटे यांचे आवाहन

0
अहमदपूरच्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा निवडणूक निर्णय अधिकारी मा मंजुषा लटपटे यांचे आवाहन

अहमदपूरच्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा निवडणूक निर्णय अधिकारी मा मंजुषा लटपटे यांचे आवाहन

अहमदपूर (गोविंद काळे) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी शंभर टक्के मतदान करून आपला हक्क बजावावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी स्वीप कलापथकाच्या कार्यक्रमात केले आहे.
दि १९ रोजी सायंकाळी अहमदपूर येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वीप कलापथकाद्वारे जनजागृती करण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार उज्वला पांगरकर, चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, नोडल ऑफिसर बबनराव ढोकाडे यांच्यासह स्वीप पथकातील सर्व सदस्य उपस्थित होते.
२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या २३६ अहमदपूर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी आपणास मिळालेल्या संविधानाचा हक्क मतदान करून पूर्ण करावा यासाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. सर्व मतदान केंद्रावर पुरेशा सुविधा मतदारासाठी पुरविण्यात आल्या आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. स्वीप कला पथकाच्या वतीने मतदान जनजागृती कार्यक्रमात विविध अभंग, लोकगीत, भारुड, गवळणी,लावणी, पोवाडा यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली
या विशेष अभियानाचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये निवडणुकीतील सहभागाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. त्यादृष्टीने या कार्यक्रमात विविध प्रबोधनपर लोकगीतातून कला सादरीकरणातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात येत आहे.
मतदान हा सुट्टीचा दिवस म्हणून साजरा न करता या दिवशी जरूर मतदान करावे, मतदान हे पवित्र कार्य आहे यासाठी देखील आपण जरूर वेळ काढावा.असे आवाहन सा. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी केले आहे.
या राष्ट्रीय लोकउत्सवात प्रत्येक मतदार बांधवांनी मतदान कारावा.संविधानाने दिलेला हक्क २० नोव्हेंबर रोजी मतदान करुन बजवावा.असा संदेश स्वीप पथकातील प्रमुख महादेव खळुरे, मोहन तेलंगे, शिवकुमार गुळवे, नागनाथ स्वामी, अर्चना माने, कपिल बिरादार, धीरज भंडे, प्रा शिवशंकर पाटील, प्रमोद हुडगे, जयप्रकाश हराळे, संभाजी एलपुरवाड, विवेकानंद मठपती यांनी दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कपिल बिरादार तर आभार प्रा.शिवशंकर पाटील यांनी मानले.
या अभियानांसाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा घुगे-ठाकुर, अहमदपूर विधानसभा निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,तहसीलदार उज्वला पांगरकर,नरसिंग जाधव शिक्षणाधिकारी नागेश मापारी,गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात जनजागृती करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *