पु. अहिल्यादेवी विद्यालयात गणित दिवस साजरा

पु. अहिल्यादेवी विद्यालयात गणित दिवस साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी सु येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सांगवी येथे प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या सचिव तथा माजी जि प सदस्या प्राचार्या रेखाताई तरडे,राजाराम बुर्ले,शेख जिलानी, संतोष मुळे, अमोल सारोळे,विठ्ठल तेलंग, कौशल्या देवकते,प्रदीप रेड्डी आदींची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी गणिताच्या विविध प्रतिकृती, आकृत्या, आदी शैक्षणिक साहित्य तयार करून आणले होते तर येल्डे साईप्रसाद आणि देवकते ज्ञानेश्वरी या विद्यार्थ्यांनी सुंदर असे मनोगत व्यक्त केले. प्राचार्या तरडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी लहान वयापासून चिकाटी परिश्रम आणि जिद्द या त्रिसुत्राचा वापर केला तर नक्कीच भविष्य उज्वल ठरतो आणि गणितात रस असणारे विद्यार्थी नक्कीच कोणत्याही विषयात सरसच ठरतात. याप्रसंगी संतोष मुळे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रदिप रेड्डी यांनी केले तर शेख जिलानी यांनी आभार मानले.यावेळी विद्यार्थी नियमाप्रमाणे उपस्थित होते.

About The Author