उदागीर बाबा समाधी दर्शनासाठी चा मार्ग बंद, तेलिन बुरुज कोसळला !

उदागीर बाबा समाधी दर्शनासाठी चा मार्ग बंद, तेलिन बुरुज कोसळला !

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्याचेच नव्हे तर पंचक्रोशीतील अनेकांचे श्रद्धास्थान असलेले उदागीर बाबा यांच्या दर्शनासाठी जाण्याचा जो मार्ग होता, त्या मार्गातील तेलीन बुरुज कोसळल्याने तो मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. सदरील बाद ही इतिहास पुरातत्त्व विभागाशी संबंधित असल्याने या विभागाकडून याची कसलीच दखल घेतली गेली नाही. जवळपास आठ दिवस होऊनही अद्यापही इतिहास पुरातत्त्व विभाग या घटनेकडे लक्ष द्यायला तयार नाही.

उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी भाविक भक्तांना समाधीचे दर्शन घेता यावे, म्हणून किल्ल्यामधून पर्यायी रस्ता काढून देऊन त्या रस्त्यावर विद्युत ची सुविधा केलेली आहे. ही एका बाजूला कर्तबगार अधिकाऱ्याची बाजू असली तरी इतिहास पुरातत्त्व विभागाने या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
उदगीरचा किल्ला हा ऐतिहासिक असून या किल्ल्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. असे असताना देखील या किल्ल्याकडे इतिहास पुरातत्त्व विभाग गांभीर्याने पाहत नाही. अनेक वेळा शासनाने दुरुस्तीसाठी पैसा दिला, मात्र थातूरमातूर दुरुस्ती करून त्या त्या वेळी काम भागून घेण्यात आले. मात्र खऱ्या अर्थाने या किल्ल्याची मजबूती करनची बाब कोणीही विचारात घेतलेली नाही. नगरपरिषद प्रशासनाने केलेल्या सुविधेमुळे भाविक भक्तांची तात्पुरती सोय झाली आहे.

About The Author

error: Content is protected !!