श्यामलाल सार्वजनिक वाचनालयात पद्मश्री एस.आर .रंगनाथन यांची जयंती साजरी

श्यामलाल सार्वजनिक वाचनालयात पद्मश्री एस.आर .रंगनाथन यांची जयंती साजरी

उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्यामलाल सार्वजनिक वाचनालयात ग्रंथालय शास्राचे जनक डाॅ.रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथालय संघाचे कार्यकारणी सदस्य तथा उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ मोतीपवळे हे होते. तर प्रमुख अतिथी सावित्रीबाई फुले वाचनालयाचे अध्यक्ष लक्ष्मण फुलारी, कै.कमळाबाई शिवनगे सार्वजनिक वाचनालयाचे सचिव रामेश्वर बिरादार, वाचक प्रतिनिधी गोपाळ रेड्डी , श्यामलाल वाचनालयाचे ग्रंथपाल ग्रंथमित्र सुर्यकांत सिरसे, सहाय्यक ग्रंथपाल सौ.रेखा लाला, सौ.अनूराधा पांचाळ उपस्थित होते.प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
आपले विचार व्यक्त करताना रामभाऊ मोतीपवळे यांनी पदम्श्री एस.अर.रंगनाथन यांच्या पंचसुत्राची माहीती सांगून आजच्या सोशल मिडियाच्या युगात ग्रंथालये टिकून ठेवण्यासाठी ग्रंथालयांनी नविन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन वाचकाला ज्ञान दिले पाहिजे.आपल्याकडे असलेली माहिती जलद उपलब्ध करुन द्यावी. असे सांगून
पदमश्री एस आर रंगनाथन यांच्या पंच सुत्रग्रंथ हे उपयोगासाठी आहे,प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे, प्रत्येक वाचकास त्याच्या आवडीचा ग्रंथ माळाला पाहिजे, प्रत्यक्षात अवलंब, ग्रंथालय हे वर्धिष्णू संस्था आहे. या पंच सुत्राचा अवलंब करणारा ग्रंथपाल व तेच खरे ग्रंथालय होय. असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल ग्रंथमित्र सुर्यकांत सिरसे यांनी केले.सचंलन व आभार सहाय्यक ग्रंथपाल सौ,रेखा लाला यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!