हर घर तिरंगा रॅलीत सहभागी व्हा – बसवराज रोडगे

उदगीर (प्रतिनिधी) :उदगीर शहरात दिनांक 13 जुलै 2022 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता शाहू चौकातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील रॅलीमध्ये उदगीरच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे यांनी केले आहे.
शाहू चौक ते शिवाजी चौक, बसवेश्वर चौक, उदगीर शहर पोलीस स्टेशन, चौबारा, सराफ लाईन मार्गे आंबेडकर चौक, उमा चौक, अण्णाभाऊ साठे चौक, उदगिरी महाविद्यालय उदगीर येथे येऊन त्या ठिकाणी त्याचा समारोप होणार आहे. या तिरंगा रॅलीचे नेतृत्व माजी आमदार सुधाकर भालेराव हे करणार आहेत.