गणेश होळे यांना झी 24 तास चा सन्मानाचा पुरस्कार जाहीर

लातूर (प्रतिनिधी) : गणेश होळे यांना झी २४ तास तर्फे देण्यात येणारा विकास महाराष्ट्राचा आवाज लातूरचा या कार्यक्रमांतर्गत पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. झी 24 तास तर्फे आपापल्या क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या व्यक्तींचा गौरव सोहळा आयोजित केला जातो. याच कार्यक्रमाच्या अंतर्गत लातूर येथील साप्ताहिक पोलीस फ्लॅश न्यूज आणि साप्ताहिक पोलीस संदेश रिपोर्टर या दोन वृत्तपत्राच्या मुख्य संपादकासोबतच गणेश होळे हे पोलीस फ्लॅश न्यूज पोर्टल न्यूज चैनल देखील चालवतात.
एक उत्कृष्ट आणि निर्भीड पत्रकार म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. पत्रकारिताक्षत्रासोबतच सामाजिक जाणीव जपण्यातही गणेश होळे हे अग्रगण्य आहेत. निपक्ष आणि निर्भीड पत्रकारिते सोबतच एक नम्र व्यक्ती म्हणून त्यांची चांगली ओळख आहे. आपल्या धाडसी, धडाडी, निर्भीड पत्रकारितेसोबत समाजातील गोरगरीब लोकांसाठीही आपण काहीतरी केले पाहिजे. ही जाणीव ठेवून त्यांची पत्रकारिता सदैव अग्रेसर राहते.
चांगल्या व्यक्तीचा गौरव करताना त्यांची लेखणी कधीही मागेपुढे पाहत नाही. तसेच जे भ्रष्ट आहेत, त्यांचे हिंडवडे काढतानाही त्यांना कधी भीती वाटत नाही. ही त्यांची खासियत पाहूनच लातूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
” सज्जनांना साथ; भ्रष्टाचारी प्रवृत्तीला लाथ “ही भूमिका घेऊन त्यांची पत्रकारिता सदैव सक्रिय असते. कित्येक वेळा त्यांच्या परखडलेखानामुळे पत्रकारितेत आर्थिक गोची निर्माण करण्याचे प्रयत्न झाले, तरीही आदर्श पत्रकारितेचा मानदंड कायम जपला पाहिजे. असा मानस कायम डोळ्यासमोर ठेवून गणेश होळे हे आपले दोन्ही वृत्तपत्र आणि पोर्टल चैनल चालवतात.
सतत चांगल्याची पाठराखण करणे हे त्यांचे कौशल्य आहे. आज पर्यंत गणेश होळे यांना शेकडो पुरस्कार मिळाले आहेत. आदर्श संपादकाचे पुरस्कार, निर्भीड पत्रकारितेचे पुरस्कार, सामाजिक जाणीव जपून गोरगरिबांना अर्थसाह्य करून मदतीचा हात दिल्याबद्दल समाजकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार! असे कित्येक पुरस्कार त्यांना देण्यात आले आहेत .
त्यांच्या विशेष अंकांना तर राज्य पातळीपर्यंत दरवर्षी पुरस्कार हे ठरलेलेच असतात!! दर्जेदार पत्रकारितेचा आदर्श घालत आपले विशेषांक वेगवेगळे विषय घेऊन, समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. त्यांचे प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहेत. त्याचीही दखल विविध संस्थांनी घेऊन त्यांना वेळोवेळी पुरस्कृत केले आहे.
आता झी 24 तास चा सन्मानाचा पुरस्कार म्हणजेच त्यांच्या आदर्श पत्रकारितेवर शिक्का मोर्तब होय. असे म्हटले तर वावगे होणार नाही.
गणेश होळे यांची पत्रकारिता अशीच बहरतच राहो, त्यांच्यावर सतत पुरस्कारांचा वर्षाव होत राहो!! आणि त्यांना समाजकार्य करण्यासाठी आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो !!
या मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

अ‍ॅड.एल.पी.उगिले, उदगीर

About The Author

You may have missed

error: Content is protected !!