मेवापूर येथे आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

मेवापूर येथे आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

अतनूर (प्रतिनिधी) : मेवापूर ता.जळकोट येथे बुधवारी (दि.१०) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातून तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
अध्यक्षस्थानी तथा मिरवणूक प्रमुख शिवसेना विभाग प्रमुख तथा युवासेना तालुका सरचिटणीस मुक्तेश्वर पाटील यांची होती. ही मिरवणूक दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होती. आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मुक्तेश्वर पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून व नारळ फोडून मिरवणुकीची सुरुवात झाली. ही मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडली. यावेळी अरविंद दहीकांबळे, पिराजी सूर्यवंशी, नितीन बटेवड, श्रीकांत दहीकांबळे, प्रशांत दहीकांबळे, राहुल दहीकांबळे, तातेराव बट्टेवाड, अण्णाभाऊ बट्टेवाड, हणमंत बट्टेवाड, भगवान बट्टेवाड, कोंडीबा दहीकांबळे, दिलीप बट्टेवाड, पवन गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, शेटीबा बट्टेवाड, विशाल दहीकांबळे, विनय दहीकांबळे, परमेश्वर बट्टेवाड, बालाजी बट्टेवाड, दीपक बट्टेवाड, सैलानी शेख व समस्त गावकरी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!