दापका सरकारी माध्यमिक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी : अंकुशराव वाडीकर

दापका सरकारी माध्यमिक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी : अंकुशराव वाडीकर

कमालनगर (एल.पी.उगीले) : सीमाभागातील कमालनगर तालुक्यातील दापका येथील शालेय व्यवस्थापन पुनर्रचना करण्यात आली आहे .शालेय व्यवस्थापन समितीचा अर्थ असा होतो की, शालेय शैक्षणिक विद्यार्थ्यांचे प्रगती करणे आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्या व त्या समस्याचे निराकरण करणे आणि शिक्षकांच्या अडीअडचणीमध्ये शिक्षकांना मदत करणे. कोणत्या शैक्षणिक समस्या असतील तर त्यासाठी पूर्तता करणे आणि सहकार्य करून शाळेचा, माध्यमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती करणे, शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे व्यवस्थापन समितीचे महत्त्वाचे अंग आहे .

आणि त्यासाठी काही उमेदवार, पालकांनी नवनिर्वाचित उमेदवाराची निवड केलेली आहे .त्यातून एक अध्यक्ष पद आणि बाकीचे सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहेत. अध्यक्षाची निवड ही लोकशाही पद्धतीने करण्यात आली. गुप्त मतदान घेऊन ही निवड करण्यात आलेली आहे. निवडणुकीसाठी शाळेचे मुख्याध्यापक भानुदास वासरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. शालेय शिक्षक संजीव बिरादार, शिवाजी सिगरे, विलास शिवपुरे, चेन्नबसव स्वामी ,राजश्री ताई, अर्चनाताई ताई ,शिक्षक व शिक्षिका त्यावेळी उपस्थित होत्या.
निवड झालेली उमेदवार खालील प्रमाणे आहेत तैमूर ,चंद्रश्रकांत भोसले , पंढरी जाधव, पांडुरंग लंगोटे, सत्यवान जाधव, सौ.मंगलाबाई विलास, सौ.शारुबाई तुळशीराम, संजीव पोतले असे शालेय व्यवस्थापन समिती मधील सदस्यांची यादी आहे.
अंकुश वाडीकर यांनी निवडणूक करण्याचा किंवा दापका माध्यमिक शाळेतील अध्यक्ष होण्याचा कोणताच विचार नव्हता पण दापका गावातील सुपुत्र विलासराव भाऊराव जाधव( गुरुजी)आदर्श मुख्याध्यापक गामपंचायत सदस्य व भूमी विकास बँकेचे औराद संचालक .यांनी गावातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी, प्रगती करण्यासाठी गुरुजी
चा आग्रह होता. आणि त्या आग्रहास्तव हा प्रश्न माझ्यासमोर ठेवल्यानंतर मला या अध्यक्षपदासाठी मी मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या आदेशामुळे मी दापका येथे अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे सर्कलची शाळा आमच्या भागातील शाळा या बद्दल मला अभिमान आहे .मी त्या शाळेचा विघार्थी होतो .या शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यामध्ये सतत प्रयत्न करीत राहणार आहे.शाळेतील शैक्षणिक दर्जा सुधारणार पात्र राहीन,अशी सामाजिक बांधिलकी स्वीकारली आहे.

About The Author