स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार व रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्यावर्धिनी शैक्षणिक संकुलातील प्राथमिक, माध्यमिक शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी अशोक चव्हाण यांनी हिमालय प्रदेश वीस वर्षे गन मॅन म्हणून सेवा बजावून सेवानिवृत्त व संजय कुंभार यांनी दारूगोळा इन फॅक्टरी साऊथ आफ्रिका,कारगिल, लदाख येथील कारखान्यात 26 वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या शैक्षणिक संकूलातर्फे शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करून आज रक्षाबंधन सण असल्यामुळे विद्यार्थिनींनी या देशभक्त वीर माजी सैनिकांना राख्या बांधल्या.रक्षाबंधन सण साजरा केला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामभाऊ हाडोळे, अविनाश पोशेट्टी ,उपमुख्याध्यापक बाबुराव नागरवाड, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पी.व्हीआजने, आर.व्ही ढगे,पी.जी काळे, बी.एम भंगे, कलाशिक्षक एन.आर जवळे यांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.व्ही बिरादार यांनी केले तर आभार अविनाश पोशेट्टी यांनी मांनले.
