प्रहार जनशक्ती पक्षाच्या उदगीर-जळकोट मुख्य संघटक पदी बंडेप्पा पडसलगे

प्रहार जनशक्ती पक्षाच्या उदगीर-जळकोट मुख्य संघटक पदी बंडेप्पा पडसलगे

उदगीर (एल.पी.उगिले) : उदगीर येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे बंडेप्पा पडसलगे यांच्या कामाची दखल, काम करण्याची तळमळ पहाता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, तथा माजी
राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष -अनिलजी गांवडे , महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोदभाऊ कुदळे , महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांनी
प्रहार जनशक्ती पक्षाच्या उदगीर-जळकोट मुख्य संघटक पदी निवड करणात आली आहे.

बंडेप्पा पडसलगे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे
पदावर काम करत असताना उदगीर शहरात व तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे तिथे
शाखा ,शाखा तिथं कार्यकर्ते करत पक्षाची ताकद वाढविन्याचे प्रयत्नं केले.

त्याचबरोबर प्रहार च्या माध्यमातून सर्व सामन्याचे , शेतकरी, कष्टकरी,दिनदुबळ्याचे व अपंग बांधवांच्या समस्या साठी पुढाकार घेऊन न्याय देण्यासाठी प्रयन्त करत असतात.
कमी काळत प्रशासनावर वचक निर्माण केली आहे.या सर्व कामाची दखल घेऊन पुन्हा एकदा प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या उदगीर-जळकोट मुख्य संघटक पदी यांची निवड लातुर जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगुले यांनी केली.

त्यांना 2 तालुक्याची जीमेदरी देण्यात आली आहे.उदगीर ,जळकोट या तालुक्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली.
सदरील नियुक्तीपत्र लातूर येथील बैठीकीत देण्यात आले.
या वेळी जिल्हाप्रमुख -राजाभाऊ चौगुले,उप-जिल्हाप्रमुख-नितीनजाधव,युवक जिल्हाप्रमुख-शंकरदादा इटकर ,
,उदगीर तालुकाध्यक्ष -रविकिरण बेळकुंदे, उदगीर-जळकोट मुख्य संघटक-बंडेप्पा पडसलगे ,सर्व 10 तालुक्याचे तालुका प्रमुख ,व पदाधिकारी व प्रहारसेवक उपस्थित होते.निवडीबदल बंडेप्पा पडसलगे यांचे सर्वत्र् अभिनंदन होत आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!