सागर महाजन यांच्यातर्फे ग्रामीण ग्रंथालयांना तिरंगा भेट

सागर महाजन यांच्यातर्फे ग्रामीण ग्रंथालयांना तिरंगा भेट

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील सागर महाजन नारायण ऍग्रो चे सर्वे सर्वा यांनी उदगीर तालुक्यातील ग्रंथालयांना तिरंगे झेंडे भेट देऊन हर घर झेंडा हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागातील वाचनालयांना शासनाने ठरवून दिलेल्या आकारातील ध्वज सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, याची जाणीव झाल्यामुळे सागर महाजन यांनी नारायण ऍग्रो च्या वतीने तिरंगे ध्वज वाटप केले आहेत. याप्रसंगी सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय शेकापूर चे अध्यक्ष लक्ष्मण फुलारी भालके हे उपस्थित होते. ज्या ग्रंथालयांना ध्वज उपलब्ध झाले नाहीत, त्यांनी तात्काळ लक्ष्मणराव फुलारी भालके यांच्याशी संपर्क साधून सागर महाजन यांच्याकडून ध्वज उपलब्ध करून घ्यावेत. असे आवाहन करण्यात आले आहे. सागर महाजन यांच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे.

About The Author

error: Content is protected !!