महात्मा फुले महाविद्यालयात रंगनाथन जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : ग्रंथालय व माहिती शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची १३० वी जयंती येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या ग्रंथालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे यांनी केले. यावेळी डॉ सतीश ससाणे, डॉ.बब्रुवान मोरे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. पांडुरंग चिलगर, डॉ. पी. पी. चौकटे, डॉ. डी. एन. माने, डॉ. संतोष पाटील,प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, ग्रंथालय परिचर वामनराव मलकापूरे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.