कालिदासाचे साहित्य म्हणजे निसर्ग आणि मानव यांचा सुंदर समन्वय – डॉ. विवेक मणी त्रिपाठी

कालिदासाचे साहित्य म्हणजे निसर्ग आणि मानव यांचा सुंदर समन्वय - डॉ. विवेक मणी त्रिपाठी

मान्यवरांच्या उपस्थितीत आभासी पद्धतीने महाकवी कालिदास का साहित्यिक योगदान या शोधनिबंध ग्रंथाचे प्रकाशन संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : संस्कृत साहित्याचे अध्यकवी कवी कुलगुरू कालिदास यांचे साहित्य म्हणजे निसर्ग व मानव यांचा सुंदर समन्वय असून कालिदासांनी निसर्गाच्या विविध छटांचे चित्रण आपल्या काव्यातून केले आहे. असे, प्रतिपादन चीन येथील संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. विवेक मणी त्रिपाठी यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ते वैश्विक संस्कृत मंच, महाराष्ट्र प्रांत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व नंदी फाउंडेशन तथा महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर च्या संस्कृत विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘आजादीच्या अमृत महोत्सवानिमित्त व संस्कृत दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या एक दिवशीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या चर्चासत्राच्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर यांची विशेष उपस्थिती होती तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे सचिव ज्ञानदेव झोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ. विवेक मनी त्रिपाठी म्हणाले की, संस्कृत साहित्य हे जगाला मिळालेली फार मोठी देणगी आहे.त्यामध्ये महाकवी कालिदासांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. संस्कृत भाषा व संस्कृत साहित्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती आज जिवंत असल्याचे दिसून येते. असेही ते म्हणाले.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘ महाकवी कालिदास का साहित्यिक योगदान ‘ या शोधनिबंध ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शिल्पी गुप्ता दिल्ली, डॉ.सिद्धनाथ मालवा, डॉ. कावेरी जाधव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले तर या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षीय समारोप समारोपाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील म्हणाले की, महाकवी कविकुलगुरू कालिदास हे प्रतिभा संपन्न कवी होते त्यांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून विविध प्रकारचे ज्ञान जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. संस्कृत साहित्याने कालिदासाप्रमाणेच अनेक कवी आचार्य विद्वान शास्त्र भारताला दिले. असेही ते म्हणाले.

या आंतरराष्ट्रीय ई – चर्चा सत्राचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांनी केला तर सूत्रसंचालन डॉ. संजीवनी नेरकर यांनी केले तसेच या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप डॉ. धनंजय कोहळेकर यांनी शांती पाठातून केला. यावेळी देश विदेशातून दोनशेहून अधिक संस्कृत प्रेमी अभ्यासक, संशोधक व विद्यार्थी यु- ट्यूब, व झूम या आभासी पद्धतीने या चर्चासत्रात सहभागी झाले होते.

About The Author