मनसे शेतकरी सेनेच्या तालुकाध्यक्षपदी बापूराव जाधव यांची नियुक्ती

मनसे शेतकरी सेनेच्या तालुकाध्यक्षपदी बापूराव जाधव यांची नियुक्ती

उदगीर : उदगीर तालुक्यात सामाजिक कार्याची तसेच शेतकऱ्यांच्या समस्येबाबत वेळोवेळी केलेल्या आंदोलनाची दखल घेत मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी बाबुराव जाधव यांची मनसे शेतकरी सेनेच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या तसेच शेतीविषयक विविध प्रश्नाबाबत मनसे सातत्याने लढा उभारत असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सातत्याने आवाज उठवणारे कार्यकर्ते बापू जाधव यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडी बाबत मनसे परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले तसेच भावी वाटचाली बाबत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जिल्हाध्यक्ष संजय राठोड, तालुक्यातील संग्राम रोडगे, शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष रामदास पाटील, शहराध्यक्ष अभय सूर्यवंशी, विभागाध्यक्ष गजेंद्र जाधव, दत्ता कारलेवाड,राजेंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author