तहसील कार्यालय उदगीर द्वारा आयोजित खुल्या बॅडमिंटन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
उदगीर : आजादी का अमृत महोत्सव निमित्त उदगीर तहसील कार्यालयाने उदगीर तालुक्यातील बॅडमिंटन खेळाडूसाठी खुल्या पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा जुने तहसिल कार्यालयातील बॅडमिंटन कोर्टवर आयोजित केल्या होत्या. सदर स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश डी पी सतावळकर व जिल्हा न्यायाधीश राजेंद्र गिरी यांच्या हस्ते करण्यात आले..
बॅडमिंटन स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ व 32 खेळाडूंनी सहभाग नोंदवला या यापैकी तीन संघ विजेता घोषित करण्यात आले प्रथम विजेता राजेश चटलावार आणि नागेश लाला द्वितीय विजेता संतोष गुट्टे आणि संतोष चव्हाण, तृतीय विजेता परीक्षित शिंदे व शंकर जाधव यांना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक व पदक देऊन गौरव करण्यात आला.
खेळाडूंना पारितोषिक वितरण हे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी व तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेसाठी भारत चामले, अॅड. बालाजी पाटील, डॉ.संदीप मुक्कावर, संदीप सानप, डॉ. स्वामी व इतर मान्यवर उपस्थित होते.
पंच म्हणून अमित सिद्धेश्वरी यांनी काम पाहिले तर गुणलेखक म्हणून विशाल कदम यांनी काम पाहिले.