नगरपरिषदेत महिला स्वयं सहाय्यता बचतगटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण संपन्न

नगरपरिषदेत महिला स्वयं सहाय्यता बचतगटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण संपन्न

उदगीर : स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. प्रत्येक देशवाशियाला अभिमान वाटावा या हेतून दिनांक ९ ते १७ ऑगस्ट स्वराज महोत्सव निमित्त शनिवार दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतगर्त स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबीर नगरपरिषदेच्या सभागृहात संपन्न झाले.
सदर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांच्या सह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियान, पर्यावरण संवर्धना करिता वृक्षारोपण व संवर्धन, प्लास्टिक मुक्ती तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील वस्ती स्तर संघ व शहर स्तर संघ बळकटीकरण इ, बाबत मार्गदर्शन केले.
शहर अभियान व्यवस्थापक विशाल गुडसूरकर यांनी गटातील उपस्थित महिला स्वयं सहाय्यता बचतगटांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन केले. व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत हरित शपथ उपस्थितांना दिली.
सेबीचे प्रशिक्षण तज्ञ प्रदिप गुडसुरकर यांनी महिला स्वयं सहाय्यता गटांचे पंचसुत्री व लेखे अद्यावत महत्व, बचत गटाने कर्ज प्रस्ताव कसा तयार करावा, गटाचे आर्थिक साक्षरता व महत्व, व्यवसायिक गुंतवणूक व वृद्धी, अटल पेंशन योजना, समाजिक सुरक्षेच्या अनुशंगाने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना इ.बाबत सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षयी मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी महिला स्वयं सहाय्यता बचतगट हे कुटुंब आहे, असे संबोधित केले. तसेच प्रशासन सदैव तुमच्या सोबत असून तुम्ही प्रशासनाच्या सोबत राहून प्रत्येक संधीचे सोने करून आपली उन्नती करावी. आपल्या क्षमता विकसित करून महिलांनी गरुड झेप घ्यावी असे आवाहन केले.
या प्रशिक्षण शिबिरांती प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सहभागी असलेल्या महापूरताई व आम्रपाली स्वयं सहाय्यता बचतगटांना प्रत्येकी रु.४ लाख कर्जाचे धनादेश तसेच पात्र १८ स्वयं सहाय्यता बचतगटांना प्रत्येकी रु.१० हजार प्रमाणे फिरता निधी वितरीतपत्रक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
या प्रशिक्षणास कार्यालयीन अधीक्षक विरेंद्र उळागड्डे, लेखाधिकारी निलेश यशवंतकर, पाणीपुरवठा अभियंता सुनील कटके, अभियंता ज्योती वलांडे, आस्थापना विभाग प्रमुख संदीप कानमंदे, संकीर्ण विभाग प्रमुख वैजिनाथ बदनाळे, संजय आडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन शहर अभियान व्यवस्थापक विशाल गुडसूरकर यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी समुदाय संसाधन व्यक्ती अनिता चौधरी, शिल्पा काळे, नितीन गवारे यांनी घेतले.

About The Author