लाॅयन्स क्लब इन्टरनॅशनल क्लबचा पदग्रहण सोहळा कार्याक्रम संपन्न; अध्यक्ष पदी विवेक जैन, सचिव भाग्यश्री घाळे
उदगीर (प्रतिनीधी) : उदगीर येथील
लॉयन्स क्लब इंटरनॅशनल उदगीर ‘पदग्रहण सोहळा २०२२-२३ कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमास
पदग्रहण अधिकारी लॉ.अजय रामचंद्र गोजमगुंडे हे उपस्थित होते.तर मंचावर उपस्थित प्रमुख मान्यवर आर.बी.गिरी.दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर उदगीर,
न्यायाधीश पि.डी.सुभेदार जिल्हा न्यायाधीश उदगीर,डाॅ.रामप्रसाद लखोटीया अध्यक्ष उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर, हे उपस्थित होते.या कार्यक्रमास प्रमुख वक्ते : डॉ.मिलींद पोतदार (जेष्ठ मानसोपचार तज्ञ)त्यांनी आस्थेची जादू या विषयावर व्याख्यान दिले.सर्व नुतन पदाधिकारी
लॉयन्स क्लब, लॉ. सुभाष वाकुडे अध्यक्ष, लॉ. अॅड. बालाजी आदेप्पा, सचिव,लॉ.अरविंद कोटलवार कोषाध्यक्ष तर लॉयन्स क्लब उमंग पदाधिकारी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पिन व प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.लॉ.विवेकचंद जैन अध्यक्ष,लॉ.डॉ.भाग्यश्री घाळे सचिव,लॉ.योगेश चिद्रेवार कोषाध्यक्ष,यांच्या सह नुतन सदस्याचा पदग्रहण सोहळा पार पडला.या सर्व नुतन लाॅयन्स उमंग लॉ.अॅड.व्यंकट मोरे अध्यक्ष,लॉ.डॉ.प्रविण मुंदडा सचिव,
लॉ.सुरेश देबडवार कोषाध्यक्ष, विजय पाटील, विजय देबडवार अमोल पोद्दार, अमित पाटील, सुमित वाकोडे डॉक्टर संदीप सोनटक्के, सिद्धेश्वर पटणे, राजकुमार नावंदर,सुशील
पेन्सलवार, विशाल अनवले, व समस्त लॉयन्स उमंग परिवार हे होते
कार्यक्रम उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय, उदय नगर, उदगीर जि.लातूर येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ऑड.बालाजी वलांडीकर यांनी केले.