लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

उदगीर : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व स्वातंत्र्य दिनानिमित्त
शालेय समिती सदस्य बालाजी राजाराम चटलावार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, लालबहादूर शास्त्री बालक मंदिरच्या अध्यक्षा सौ अंजलीताई नळगीरकर, शिवाजी कॉलेजचे माजी प्राचार्य चंद्रशेन मोहिते, बालवाडी विभाग प्रमुख सौ छाया कुलकर्णी, विभाग प्रमुख सुधाकर पोलावार, सुरेखाबाई कुलकर्णी, स्वयंसेवक संतोष जिरोबे, किरण सनगले व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
व्यासपीठावरील मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मुलींनी भारत मातेची आरती केली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी एकूण ७५ क्रांतिकारकांची सचित्र माहिती तयार करून, हस्तलिखित तयार केले होते. हस्तलिखित पुस्तकाचे विमोचन व्यासपीठावरील शालेय समिती अध्यक्ष व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ,शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.प्रदर्शनातील शैक्षणिक साहित्य व हस्तपुस्तिकेचे मान्यवरांनी तोंड भरून कौतुक केले.भारत मातेच्या वेशभूषेत आलेल्या चौथी वर्गातील कु.प्रत्युशा पुरी व क्रांतिकारकाच्या वेशभूषेत आलेल्या चि अवधूत इंद्राळेचे शालेय समिती अध्यक्षांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांची भाषणे झाली.भाषणात सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी खूप कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सुरेखाबाई कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाविषयी,आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या क्रांतीकारक, थोर पुरुष यांच्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे सर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शैक्षणिक साहित्य व क्रांतिकारकांचे सचित्र हस्तलिखित तयार केल्याबद्दल खूप कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांनी ७५ क्रांतिकारकांचे हस्तलिखित जरूर वाचावे.असे आवाहन केले व स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्याम गौंडगावे यांनी केले. वैयक्तिक पद्य रमेश सातपुते यांनी गायले तर,आभार सौ सविता बोंडगेबाईंनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना सोनपापडी खाऊ म्हणून वाटप करण्यात आला.

About The Author