कासार सिरसी येथील उर्दू शाळेतल्या गैरसोयी दूर करण्याची मागणी

कासार सिरसी येथील उर्दू शाळेतल्या गैरसोयी दूर करण्याची मागणी

कासार सिरसी (बालाजी मिलगीरे) : कासार शिरसी येथील गुलशने ए अतफाल व रहमानिया उर्दू या इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या उर्दू शाळेत अनेक गैरसोयी आहेत त्या दूर करणे संदर्भ येथील अल्पसंख्याक समाजाचे अध्यक्ष जिलानी भाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष फारुख देशमुख व मुख्याध्यापक निसार शेख यांना निवेदन देण्यात आलेकासार शिरसी येथील अल्पकाळात नावा रूपाला आलेली ही उर्दू शाळा या प्रशाले च्या सुसज्ज इमारतीत जवळ पास चारशे विद्यार्थी शिक्षण घेत असतात यामुळे याप्रशालेस कासार शिरशीतल्या शैक्षणिक क्षेत्रात विशेष मान आहे असे जरी असले तरी या ठिकाणी अनेक गैरसोई असल्याचे दिसून येत आहे प्रसाधन ग्रह आहे ते अस्वच्छ आहे याची दुरावस्था झाली असून मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह उभारावे मुलांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे परिसर स्वच्छ ठेवावा विद्यार्थ्यांत समानता निर्माण व्हावी यासाठी गणवेशावर भर द्यावा इथे मुलींची संख्या जास्त असल्याने त्यांच्यासाठी एका महिला सेविकाची नेमणूक व्हावी नोकरभरतीबंद असल्याचे कारण न सांगता आपल्या संस्थे अंतर्गत येणाऱ्या काही शाळातून या ठिकाणी सेवीका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी व पालक मेळावा घेऊन शालेय व्यवस्थापन समिती नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली असून देण्यात आलेल्या या निवेदनावर सर्वश्री म रफिक आतार महेबूब घाटे मैनु बागवान जिलानी बागवान आयुब बागवान आयुब बागवान आणि आली नासरजंग लतीफ टेलर मिनाज बागवान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात दिलेल्या वेळेत सर्व मागण्या पूर्ण करण्यात यावा अन्यथा संस्था विरुद्ध आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या निवेदनात दिलेला आहे.

About The Author