आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली रेणापुर, मुरुड तिरंगा रॅलीला मोठा प्रतिसाद

आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली रेणापुर, मुरुड तिरंगा रॅलीला मोठा प्रतिसाद

लातूर (प्रतिनिधी) : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतील हर घर तिरंगा अभियान अंतर्गत रेणापूर आणि मुरुड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार १४ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाला. या रॅलीत भाजपाच्या कार्यकर्त्यासह नागरिकांनी मोठा सहभाग नोंदवला. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्याच्या आझादीचा अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात “हर घर तिरंगा” हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येकाने आपापल्या घरावर देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला तिरंगा ध्वज दिनांक १५ ते १५ ऑगस्ट या कालावधीत लावायचा आहे.

या अभियानाची जनजागृती व्हावी या उद्देशाने भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली रेणापुर आणि मुरुड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रेणापुर पिंपळफाटा परिसरात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली तर रेणापुर शहरात तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली. मोठ्या उत्साहात निघालेली ही तिरंगा रॅली पिंपळ फाटा येथून निघून रेणापूर गावात फेरी मारून रेणापुरचे ग्रामदैवत रेणूका देवी मंदिर येथे रॅलीची सांगता झाली. तर मुरुड शहरातील आंबेडकर चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, बस स्टॅन्ड यासह सर्व प्रमुख मेन रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप मुरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला. रॅलीत सहभागी झालेल्या अनेकांनी भारत माता की जय, वंदे मातरम, तिरंगा झेंडा उंचा रहेगा हमारा यासह विविध गगनभेदी घोषणा देऊन रेणापूर दनाणून सोडले होते. मोठ्या उत्साहाच्या आणि जल्लोषाच्या वातावरणात निघालेल्या या तिरंगा रॅलीमुळे देशभक्तीमय वातावरण तयार झाले होते.

रेणापुर आणि मुरुड येथे आ. रमेशआप्पा कराड यांचे अगमन होताच त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी रेणापुर येथे तहसिलदार धम्मप्रिया गायकवाड, रेणापुर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिंदे दिपक तर मुरुड आणि रेणापुर येथील तिरंगा यात्रेत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, अमोल पाटील, लातूर ग्रामीण विधानसभा भाजपाचे अध्यक्ष अनिल भिसे, ओबीसी आघाडीचे मराठवाडा संयोजक डॉ. बाबासाहेब घुले, जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत बापू नागटिळक, चंद्रसेन लोंढे, विजय काळे, सतीश आंबेकर, ललिता कांबळे, लता भोसले, वंसत करमुडे, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, रेणापुर तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, माजी उपसभापती अनंत चव्हाण, माजी जि प सदस्य सुरेंद्र गोडभरले, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष शरद दरेकर, शिक्षक सेल जिल्हा संयोजक सिद्धेश्वर मामडगे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक महेश गाडे, रेणापूर शहराध्यक्ष दत्ता सरवदे, आनंत कणसे, मुरुड शहराध्यक्ष वैभव सापसोड, युवामोर्चा तालूकाध्यक्ष धनराज शिंदे, राज जाधव, अमोल बिडवे, सुधाकर गवळी, बालाजी दुटाळ, महिला आघाडी अध्यक्षा उषाताई शिंदे, भअनुसया फड, शिला आचार्य, किसान आघाडीचे अध्यक्ष शिवमुती उरगुंडे, दलित आघाडी अध्यक्ष अजित गायकवाड, श्रीकृष्ण जाधव, विजय चव्हाण, उज्वल कांबळे, श्रीकृष्ण मोटेगावकर, जलील शेख, दिनकर राठोड, श्रीकृष्ण पवार गणेश चव्हाण, रमाकांत फुलारी, श्रीमंत नागरगोजे, राजू आलापुरे, अच्युत कातळे, हरीकृष्ण गुरले, सुरेश बुड्डे, अंतराम चव्हाण, प्रवीण शिंदे, लखन आवळे यांच्यासह तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author