लातूर एमआयटी येथे उत्साहात स्वातंत्र्य दिन

लातूर एमआयटी येथे उत्साहात स्वातंत्र्य दिन

आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण

लातूर (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा दिन माईर्स एमआयटी वैद्यकीय शैक्षणीक संकुल, लातूर येथे सोमवार दि. १५ आँगस्ट २०२२ रोजी सकाळी ९.२० वाजता लातूर एमआयटीचे कार्यकारी संचालक तथा विधानपरिषदेचे सदस्य आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस आ. रमेशअप्पा कराड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरवर्षी देण्यात येणारा कै. मोनिका ढाका पुरस्कार इब्राहिम जाकीर तांबोळी (२०२२) आणि रसिका रामेश्वर सेलूकर (२०२१) तर उत्कृष्ट गुणवंत विद्यार्थी पुरस्कार अनुराधा वागलगावे यांना यावेळी प्रदान करण्यात आला. एमआयटी संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचाही यावेळी सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. पी. जमादार, उपअधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, शैक्षणिक संचालिका डॉ. सरिता मंत्री, दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे, फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पल्लवी जाधव, नर्सींग महाविद्यालयाचे प्राचार्य सरवनन, प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे, डॉ अरुण कुमार राव, डॉ चंद्रकला पाटील, डॉ विद्या कांदे, डॉ सचिन भावठाणकर, डॉ मुकुंद भिसे, डॉ एस एस कुलकर्णी, डॉ आशा पिचारे, डॉ. फिरोज पठाण यांच्यासह एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, फिजीओथेरपी महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी, पालक व नागरीक ध्वजारोहन कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author