खादी भंडार येथील कामगारांसाठी इनरव्हील क्लब तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
उदगीर (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने इनरव्हील क्लबच्या वतीने उदगीरच्या खादी भंडार येथील अनेक वर्षांपासून तिरंग्यासाठी कापड बनविण्याची सेवा देणाऱ्या जेष्ठ नागरिक, कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. यामध्ये हिमोग्लोबिन तपासणी रक्तदाब तपासणी व अन्य तपासणी विशेष करून महिलांना मधील अॅनेमिया साठी तपासणी करण्यात आली.
यासोबतच मल्टी व्हिटॅमिन ,आर्यन परेसिटीमोल टॅबलेट आणि राजगिरा लाडू याचे वाटप करण्यात आले.या साठी इनरव्हील क्लबच्या सदस्या डॉ सौ अंबिका कोडगिरे यांनी पुर्ण वेळ देऊन ही तपासणी केली.
या उपक्रमासाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ मीरा चंबुले, उपाध्यक्ष सौ. स्वाती गुरुडे, सचिव सौ. शिल्पा बंडे, कोषाध्यक्ष सौ. मानसी चन्नावार, एडिटर सौ. पल्लवी मुक्कावार याच बरोबर सदस्य योजना चौधरी, पल्लवी पोलावार, प्रा. सौ. शकुंतला पाटील, सौ. श्रेया शिरसीकर उपस्थित होत्या. खादी भंडारचे अकबर शेख अहमद व्यवस्थापक, उत्तम गायकवाड,शकूतंला ज्ञानोबा सांळूके यांनी सहकार्य केले.