कौशल्य विकास मंचच्या वत्तीने खडू मशिन व पंच्याहत्तर महिलांना रेशनचे किट वाटप
उदगीर प्रतिनिधी : भारत देशाच्या अमृत महोत्सवाचे औचीत्य साधून विधवा ,
परीतक्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था उदगीर अंतर्गत महिला कौशल्य विकास मंचच्या वत्तीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . हा मेळावा शहरातील रघुकूल मंगल कार्यालयात घेण्यात आला .या मेळाव्यासाठी देवणी,जळकोट,अहमदपूर, शिरूर अनंतपाळ तालूक्यातील गरजू सतरा महिलांनाउद्योग उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने खडू बनविण्याचे मशिन देवून त्यांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले.
पंच्याहत्तर विधवा महिलांना रेशनचे किट देण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नामदेव कदम (आरोग्यदूत) तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी आ. सुधाकर भालेराव,डॉ सुलोचना शैलेश येरोळकर, दिपाली औटे,श्रीकांत काळे, संभाजी बेळकोणे,संगीता नेत्रगावे आदीजन उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पर भाषण
कविताई राठोड यांनी केले, तर सुत्रसंचलन ज्ञानोबा भंडे यांनी केले. आभार संगीता नेत्रगावे यांनी मानले .