स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शालेय साहित्यांचे वाटप
उदगीर (प्रतिनिधी) : उमरगा येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन उमरदरा शाखाध्यक्ष लक्ष्मण लांदागे यांच्या संकल्पनेतून जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी उमरदरा सरपंच ओमप्रकाश गुट्टे, व उपसरपंच सौ. वंदणाबाई गुट्टे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक मरतुळे , तालुका उपाध्यक्ष अंकुश नागपूर्णे, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष महेश देशमुख, शेतकरी सेना तालुका उपाध्यक्ष गजानन पदमपल्ले, वांजरवाडा विभाग प्रमुख ऋषिकेश भोंग, उमरदरा शाखाध्यक्ष लक्ष्मण लांडगे, उमरगा शाखा उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत गुट्टे, उमरगा शाखा उपाध्यक्ष माणिक जोगपेटे, चंद्रकांत थोटे, पंडित तेलंगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.