उदगीर सायकलिंग क्लबचा अभिनव उपक्रम

उदगीर सायकलिंग क्लबचा अभिनव उपक्रम

उदगीर :- सायकलिंगच्या प्रचार व प्रसारासाठी उदगीर सायकलिंग क्लब विविध उपक्रम राबवते. यावर्षी आजादी का अमृत महोत्सवानिमित्त उदगीर सायकलिंग क्लबने उदगीर ते भालकी क्रॉस 75 किलोमीटरची सायकलिंग करून आपल्या देशाचा अमृत महोत्सव साजरा केला. या अगोदर अमृत महोत्सव निमित्त कन्याकुमारी उदगीर ते कन्याकुमारी सायकलिंग यशस्वीपणे पार पडली होती. ‌
उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी व कान, नाक, घसा तज्ञ डॉ. संजय कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी चौकात हिरवी झंडी दाखविल्यानंतर सायकलिंगला सुरुवात करण्यात आली.विशेष म्हणजे यात ७५ वर्षे वयाचे ज्येष्ठ नागरिक सिद्रामप्पा दुलंगे यांनी सहभाग घेतला व यशस्वीपणे अंतर पार केले. भालकी क्रॉस येथे सायक्लिस्ट पोलिस इन्स्पेक्टर गुरण्णा हेब्बल, डॉ शशिकांत भुरे, दिलीप पांचाळ, श्रद्धा कॅम्पुटर चे प्रमुख कांबळे यांनी सर्व सायकल स्वारांचे यथोचित हार्दिक स्वागत केले‌. चहा पाण्यानंतर परत उदगीरकडे परतीची सायकलिंग करण्यात आली. ही सायकलिंग यशस्वी करण्यासाठी डॉ संजय कुलकर्णी, डॉ गजानन टिपराळे, कपिलदेव कल्पे, प्रा. मुकेश कुलकर्णी, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक सुशीलकुमार पांचाळ, नारायण पोले, अमोल पाटील, राहुल वट्टमवार, नवनाथ मोरखंडे यांनी पुढाकार घेतला. प्रा सुशील माका, अनिरुद्ध जोशी, सुनील ममदापुरे, आकाश मंठाकर यांनी सर्व संघाला बॅकअप देण्याचे महत्त्वाचे काम केले.या उपक्रमासाठी समन्वयक म्हणून विवेक होळसंबरे व मुकेश नेरुणे यांनी काम केले.
या 75 किलोमीटर अंतराच्या अमृत महोत्सवी सायकलिंग मध्ये डॉ प्रविण मुंदडा, नागनाथ वारद, अतुल वाघमारे, कपिल वट्टमवार , नारायण पोपलाई, माधव भूतापल्ले,अनुज देशमाने,नवनाथ मोरखंडे, प्रितेश कांबळे , सचिन शेंद्रे, अभिजित नळगीरकर, सुजित जाधव, चंडेगावे ज्ञानेश्वर, श्याम सुगंधी, सचिन कलकोटे, महेश आलमकेरे, जगदीश पंडित,सुनीत देबडवार, गणेश कांबळे, बाळु पाटील, स्वप्निल ममदापुरे,राहूल बाचे,ऋषिकेश बोधनकर, अश्विन पांढरे, रामेश्वर सोनी यांनी सहभाग घेतला.

About The Author