संग्राम आप्पा शेटकर यांचे जीवन म्हणजे त्यागाचे प्रतीक – आ.संजय बनसोडे

संग्राम आप्पा शेटकर यांचे जीवन म्हणजे त्यागाचे प्रतीक - आ.संजय बनसोडे

उदगीर (प्रतिनिधी) : महान स्वातंत्र्य सेनानी संग्रामअप्पा शेटकार यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान लाख मोलाचे आहे. स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून आणि त्यांनी सांडलेल्या रक्तातून हे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे त्या स्वातंत्र्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. असे विचार उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर येथील संग्राम स्मारक विद्यालयांमध्ये संग्राम आप्पाचा 83 वा स्मृतिदिन साजरा करताना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारत लीबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. गुणवंतरावजी पाटील हैबतपुरकर हे होते.
पाहुणे म्हणून वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांतआण्णा वैजापूरे, महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव उमेश पाटील देवणीकर, संस्थेचे उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, कोषाध्यक्ष शंकरआप्पा हरकरे, सहसचिव प्रभूराज काप्पिकेरे,हवगीस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय शिंदे, उप प्राचार्य काळगापुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामराव बिरादार, श्रीकांत बडीहवेली, सुभाष धनुरे, साईनाथ चिमेगाव, संग्राम समारक विद्यालयाचे मुख्याध्यापक बिरादार बी. व्हीं., पर्यवेक्षक ए बी हक्के, कार्यालयीन अधीक्षक कबाडे रा ग, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अ कि कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना संजय बनसोडे यांनी सांगितले की, संग्रामआप्पा यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास सर्वांनी करावा. वीरशैव समाजाच्या बांधकामाचा आर्थिक निधीचा प्रस्ताव मी मान्य करतो. असे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. राजकुमार मस्के यांनी संग्रामआप्पाच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. संग्रामआप्पा शेटकार एक देशभक्त, क्रांतिकारक मानवतावादी दृष्टिकोन ठेवून समाज हितासाठी लढणारे व्यक्तिमत्त्व होते. अल्प आयुष्यात मरावे परी, कीर्ती रूपे उरावे. असे कार्य त्यांनी करून दाखवले. अवघ्या 37 वर्षात संग्रामआप्पा शेटकार यांनी इतिहास रचला, असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गुणवंतरावजी पाटील हैबतपुरकर यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.या प्रसंगी चंद्रकांत वैजापूरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author