अवर सचिव माळी यांच्या हस्ते हत्तीबेटावर वृक्षारोपण
उदगीर प्रतिनिधी : आझादी का अमृत महोत्सवा निमित्ताने ७५व्या स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अवर सचिव धनवंत माळी यांच्या हस्ते हत्तीबेटावर ७५झाडांचे रोपण करण्यात आले.
अवर सचिव माळी यांनी लातूर तालुक्यातील बिंदगीहाळ येथील बचत गटामार्फत तयार करण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिन निर्मिती उद्योगाला भेट देऊन उदगीर तालुक्यातील हत्तीबेट येथे ७५वृक्षांची लागवड करण्यात आली. व्ही. एस.कुलकर्णी यांनी अवर सचिव धनवंत माळी यांचा सत्कार करुन सर्व झाडे हे जोपासले जातील याचे आश्वासन दिले. त्यानंतर देवर्जन ता. उदगीर येथील झाशीची राणी महिला ग्राम संघाचे माळी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले प्रसंगी जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, माजी जि. प. सदस्य चंद्रप्रकाश खटके, माजी पं. स. सदस्य ईश्वर खटके, जिल्हा व्यवस्थापक-मार्केटिंग वैभव गुराळे,जिल्हा व्यवस्थापक-सामाजीक समावेशन अनिता माने, जिल्हा व्यवस्थापक – आर्थीक समावेशन मुरहारी सावंत, तालुका अभियान व्यवस्थापक उदगीर श्रीकांत श्रीमंगले,तालुका अभियान व्यवस्थापक देवणी सुरेश सुगावे, ग्रामसेवक भीम मांडोळे,तालुका व्यवस्थापक संतोष भुताळे व सर्व उमेद कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमानंतर अवर सचिव धनवंत माळी यांनी ग्रामसंघाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले.व महत्वपूर्ण सुचना केल्या. यानंतर तोंडचीर येथील कन्याकुमारी गटाच्या ग्रह उद्योगाला भेट देऊन पाहणी केली.